top of page
Dr. Dileep Balkrishna Wani

डॉ. दिलीप बाळकृष्ण वाणी
                                               
M.D. (Pathology)

नमस्कार मंडळी!

 

डॉ. वाणी ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत!

 

तसे पाहता मी व्यवसायाने मेडिकल डॉक्टर. परंतू मला माझ्यात एक लेखक दडला आहे ह्याची एव्हाना जाणीव झाली आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला वाचन आणि लिखाणाची आवड आहे. वडील संस्कृत चे प्राध्यापक असल्याने माझ्या अंगी हाडाच्या शिक्षकाचे गूणही आलेच. त्यात मला लहानपणीपासूनच्या अनेक गोष्टी अगदी बारकाव्याने लक्षात आहेत. दैवी देणगीच म्हणावी जणू!

 

परिणामी सखोल अभ्यास, तीक्ष्ण स्मृती व कुशाग्र बुद्धिमत्ता ह्यांच्या जोरावर मी आवडीच्या विषयांवर लिखाण करू लागलो. वाणी समाजाचा इतिहास, कुलदैवता सारख्या प्रगल्भ विषयांपासून ते वैद्यकीय महाविद्यालयीन किस्से अशा अनेकविध विषयांवर लिखाण केले. तसेच आता मित्रपरिवार, कुटुंब, सहकारी डॉक्टर्स ह्यांच्या whatsapp गटांवर  नवनवे विषय निघतात आणि मी माझ्या ह्या आवडीनुसार त्या विषयांवर पोस्ट्स लिहितो. ह्या पोस्ट्सना प्रचंड प्रतिसाद देखील मिळतो. त्यांना माझ्यातील लेखक प्रकर्षाने दिसून येतो.

 

माझे लिखाण आणि त्याला मिळणार प्रतिसाद पाहता प्रथमतः विषयानुरूप पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार होता. नंतर मुलाने सुचवले कि "बाबा, त्यापेक्षा आपण तुमच्या पोस्ट्स चा ब्लॉग बनवूया!" मला देखील ही संकल्पना आवडली. हातात पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा मोबाईल मध्ये ब्लॉग पाहणे आताच्या काळाला जास्ती सूट होईल! अशाप्रकारे ह्या ब्लॉगचा आज माझ्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून जन्म झाला.

 

तर मंडळी, माझ्या ह्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार! इतिहास, सिनेसृष्टी, वैद्यकीय, विनोद, साहित्य, भूगोल, दंतकथा, भाषा, सणवार, रीती परंपरा, खाद्यसंस्कृती, पुराण, अशा अक्षरशः सर्व प्रकारच्या विषयांवरच्या पोस्ट्स चा आस्वाद घ्या!

 

Like Share Subscribe! Happy reading

Thank you !!
bottom of page