top of page

"Oppenheimer - Part २०"

  • dileepbw
  • Jan 22, 2024
  • 4 min read

"Oppenheimer - Part २०"

काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार

घरबसल्या ब्राझिलियन व्हिस्कीचे घुटके घेत घेत प्रसिद्ध दिग्दर्शक "ख्रिस्तोफर नोलन" यांचा "Oppenheimer" हा गाजलेला चित्रपट पहायचा योग आला.

कळायला अवघड असलेला हा चित्रपट पहिल्या पंधरा मिनिटातच प्रतिभा व माधवी यांची "विकेट" काढून गेला. उरलेले "गुगल सर्च" करीत करीत हा चित्रपट समजावून घ्यायचा प्रयत्न करीत होते.पण सगळेच "गुगल" वर नसते. मग मीच हा पुढचा भाग लिहायला घेतला.आधीचे भाग पुन्हा वाचा.मग संदर्भ कळेल !

माझा वर्गमित्र काशिनाथ याच्या मते जगातले जवळ जवळ सर्व शोध ज्यांनी कधी "गीता" पाहिलेली देखील नाही अशा परकीय,ख्रिश्चन लोकांनी लावलेले आहेत.आपले पूर्वज फक्त "गीता" समजावून न घेता फक्त पाठ करत बसले. त्यामुळे ज्याची "गीता पाठ,तो विद्वान" असं आपलं समीकरण झालेलं आहे.काशिनाथचे हे "पूर्वग्रहदूषित मत" फारसे लक्षात घेण्यासारखे नाही.त्याने "श्री.प्रवीण मोहन" या संशोधकाचे VDOs अवश्य पहावेत. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा जन्म होण्यापूर्वीच हे सर्व शोध काही हजार वर्षांपूर्वीच भारतीयांना लागलेले होते,हे त्याच्या सहज लक्षात येईल. असो.

जशी "गीता" काही जणांच्या डोक्यावरून जाते तसाच "Oppenheimer" हा सिनेमा देखील अनेकांच्या "डोक्यावरून गेला" ! अशा भारतीय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत.‘एक बॉम्ब असतो आणि मध्येमध्ये लोक इंग्रजीत काही तरी बडबड करीत असतात' ! अशी हा

चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांची प्रतिक्रिया असते.सध्या हा "रिव्ह्यू" इतका "व्हायरल" होतोय की त्यामुळे जगभर चांगला "सुपरहिट" झालेला हा चित्रपट भारतात तिकिटबारीवर आपटतोय की काय ? अशी शंका मला येऊ लागली आहे.

भारतीय सिनेसृष्टीत सध्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. खरं तर हा एक हॉलिवूडपट आहे. पण तरी देखील भारतीय प्रेक्षक मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी तिकिटबारीवर अक्षरश: तुटून पडताना दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक "ख्रिस्तोफर नोलन" यानं केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे नोलनचे चित्रपट फारच कमी प्रेक्षकांना पहिल्या झटक्यात कळतात. कारण त्याच्या चित्रपटांचा "अन्वयार्थ" इतका गहन असतो की तो बहुतेक वेळा प्रेक्षकांच्या डोक्यावरून जातो.

नोलनचे चित्रपट पाहाणं हा जणू एक "स्टेटस सिम्बॉल" झालाय. अन् त्यामुळेच नुसती "शायनिंग" मारण्यासाठी अनेकजण सिनेमागृहात गर्दी करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर चित्रपट न कळलेल्या काही प्रेक्षकांनी "ओपनहायमर" बाबत रिव्ह्यू दिले आहेत. हे गंमतीशीर रिव्ह्यू सध्या भारतात व्हायरल होत असून "नेटकरी" त्यावर आणखी गंमतीशीर प्रतिक्रिया देताना दिसतायेत.वाचा.

१.उगाच फिल्म स्पॉईल केली.

२.वाद तर झालाच पाहिजे! 'हॉलिवूडवाले' जोमात,पण भारत-बॉलिवूड मात्र रागात !

३.ओपनहायमरमध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन; नेटिझन्सच्या रागाचा भडका !

एकंदरीत काय ? माझी उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट होता ! शेवटी काल रात्री एकदाचा तो पहायचा योग आला. एक तर मी "भारतीय संस्कृती" प्रेमी ! भारतीय संस्कृती बरोबरच "संस्कृत" भाषा प्रेमी ! बालपणापासून "गीता" घोकणारा ! नुसता "घोकू" नाही तर गीतेचा वैद्यकीयदृष्ट्या अभ्यास करणारा ! त्यामुळे काल मला या चित्रपटातले काय भावले ते सांगतो.

जगातील पहिल्या अणुस्फोटाचे सांकेतिक नाव होते "ट्रिनिटी" ! काय आहे याचा अर्थ ? भारतीय तत्वज्ञानानुसार "त्रिदेव" ! ब्रह्मा,विष्णू व महेश ! ब्रह्मा "सृजन",विष्णू "पालन" व महेश "विनाश" करणारे तत्व ! याची पुरेपुर जाणिव अमेरिकन अणुविज्ञानतज्ञ "राॅबर्ट ओपनहायमर" ला आहे.ती जाणिव इतकी तीव्र आहे की "संभोगातून समाधी" लागलेली असताना देखील तो ती विसरू शकत नाही.आपले अणुसंशोधन राजकारणी लोक जगाच्या कल्याणासाठी वापणार नसून जगाच्या विनाशासाठी वापरणार आहेत या कल्पनेनेच तो "अस्वस्थ" आहे.आठवतो त्याचा चित्रपटाच्या शेवटाच्या वेळचा चेहेरा ? काय मिळवले त्याने जगातील पहिला अणुस्फोट करून ? आपल्या राष्ट्राची वाहवा ? का संपूर्ण जगाकडून "छी-थू" ? का सहकारी "स्ट्राॅस" याचा द्वेष ? आपल्याच देशातून पळून जायची वेळ का आली त्याच्यावर ?

गीतेमधला "मैं समय हूॅं ! मै ही "काल" हूॅं !" हा श्लोक का त्याचा सातत्याने पिच्छा पुरवत होता ? ही "भारतीय तत्वज्ञान" मधली जादू "ख्रिस्तोफर नोलन" याला बरोबर कळाली. आपल्याला कधी कळणार ?

या चित्रपटातील "फ्लॅश बॅक" मधल्या घटनांपेक्षा "सद्य परिस्थिती" मधील घटना काळजीपूर्वक पहा.मानवी मनाचे कंगोरे "ख्रिस्तोफर नोलन" याने कसे उलगडून दाखवले आहेत तेच तर खरे पहाण्यासारखे आहेत.तोच या "चित्रपटाचा आत्मा" आहे असे मला तरी वाटले.तुम्हाला काय वाटले ?

माझी लेखनाची आवड लक्षात घेऊन माझा मेलबर्नस्थित पुतण्या गौरवने मला Christopher Nolan या अमेरिकन दिग्दर्शकाचा "Oppenheimer" हा सिनेमा पहाण्याचा व त्यावर लिहिण्याचा आग्रह केल्याने मागे मी "Oppenheimer" नावाची एक "लेखमाला" लिहीली होती. माझे लीड्सस्थित चिरंजीव वैभव भारतात आले होते तेव्हा हा सिनेमा "डोक्यावरून गेला" अशी तक्रार करत होते.म्हणून तेव्हाच त्याचा अभ्यास केला होता व सर्वांना सांगीतला होता. त्याचा काल रात्री हा चित्रपट पहाताना खूप उपयोग झाला.

माझा मेलबर्नस्थित पुतण्या गौरव व इंग्लंडस्थित चिरंजीव वैभव यांच्यासारखीच "डोक्यावरून गेला" अशीच प्रतिक्रिया अनेक भारतीय प्रेक्षकांनी कशी व्यक्त केली आहे ते आता पहा:-

"एक बॉम्ब असतो आणि मध्येमध्ये लोक इंग्रजीत काही तरी बडबड करीत असतात" ! हा रिव्ह्यू सध्या इतका "व्हायरल" होतोय की त्यामुळे जगभर चांगला "सुपरहिट" झालेला हा चित्रपट आता तिकिटबारीवर आपटतोय की काय? अशी शंका मला येऊ लागलेली आहे.

जगभरातील सिनेसृष्टीत सध्या ‘ओपनहायमर’ या चित्रपटाची चर्चा आहे. खरं तर हा एक हॉलिवूडपट आहे. पण तरी देखील भारतीय प्रेक्षक मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी तिकिटबारीवर अक्षरश: तुटून पडताना दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक "ख्रिस्तोफर नोलन" यानं केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे नोलनचे चित्रपट फारच कमी प्रेक्षकांना पहिल्या झटक्यात कळतात. कारण त्याच्या चित्रपटांचा "अन्वयार्थ" इतका गहन असतो की तो बहुतेकवेळा प्रेक्षकांच्या डोक्यावरून जातो.

नोलनचे चित्रपट पाहाणं हा जणू एक "स्टेटस सिम्बॉल" झालाय. अन् त्यामुळेच नुसतीच "शायनिंग" मारण्यासाठी अनेकजण सिनेमागृहात गर्दी करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर चित्रपट न कळलेल्या काही प्रेक्षकांनी "ओपनहायमर" बाबत रिव्ह्यू दिले आहेत. हे गंमतीशीर रिव्ह्यू सध्या व्हायरल होत असून "नेटकरी" त्यावर आणखी गंमतीशीर प्रतिक्रिया देताना दिसतायेत.वाचा.

१.उगाच फिल्म स्पॉईल केली.

२.वाद तर झालाच पाहिजे! 'हॉलिवूडवाले' जोमात,पण भारत-बॉलिवूड मात्र रागात !

३.ओपनहायमरमध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन; नेटिझन्सच्या रागाचा भडका !

एकंदरीत काय ? माझी उत्सुकता ताणणारा हा चित्रपट होता.एक तर मी "भारतीय संस्कृती" प्रेमी ! संस्कृती बरोबरच "संस्कृत" भाषा प्रेमी ! बालपणापासून "गीता" घोकणारा ! नुसता "घोकू" नाही तर गीतेचा वैद्यकीयदृष्ट्या व वैज्ञानिक अभ्यास करणारा ! त्यामुळे मला तरी हा चित्रपट चिंगलाच भावला.

Recent Posts

See All
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"शर्मिला-धर्मेंद्र वाढदिवस"

"शर्मिला-धर्मेंद्र वाढदिवस" दि.८ डिसेंबर,२०२२ हा शर्मिलाचा ७८ वा व धर्मेंद्रचा ८९ वा वाढदिवस ! त्या निमित्ताने आरतीने शर्मिलाचा "खळीदार"...

 
 
 

Opmerkingen

Beoordeeld met 0 uit 5 sterren.
Nog geen beoordelingen

Voeg een beoordeling toe
bottom of page