top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३०"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३०"


प्रतापने म्हटल्याप्रमाणे कुणाही कडून काहीही शिकण्यात कमीपणा वाटू नये.चांगले निरिक्षक व गुणग्राहक असावे. आयुष्यातला हा सर्वात "मोठा धडा" इंटर्नशिपच्या पहिल्याच दिवशी मी माझे सिव्हिल सर्जन डाॅ.चिकोडी यांच्याकडून शिकलो व तो आजही विसरलेलो नाही.

"Histopathology" चे "Automation" झेपणार नाही हे लक्षात येताच मी Cytology कडे वळालो.माझे वर्गमित्र डाॅ.प्रमोद शंकर धायगुडे हे पुणे महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी तर मी मानद पॅथाॅलाॅजिस्ट ! आम्ही दोघांनी कमला नेहरू रूग्णालयात Vaginal Cytology हा विभाग सुरू केला.पुणे महानगरपालिकेची पूर्णवेळ पॅथाॅलाॅजिस्ट अनघा जोगने संपूर्ण सहकार्य केले.भरपूर काम करायला मिळाले.

अडचणीच्या रुग्णांसाठी यशवंतराव चव्हाण रूग्णालय, पिंपरी-चिंचवडचा तुषार पाटील हा ताज्या दमाचा पॅथाॅलाॅजिस्ट मदत करू लागला.त्याने तेथे नुकताच FNAC विभाग सुरू केला होता.तिथला सर्जन डाॅ.मंगेश पानसे हा माझा वर्गमित्र ! त्यामुळे मला तेथील सर्व FNAC पहायला परवानगी मिळाली.

रोज रात्री लॅब बंद झाली की मी व तुषार रोजच्या FNAC एकत्र पाहू लागलो.रोज बेरात्र व्हायची.पण माझा उत्साह काही संपत नसे.त्यातच बापटसरांच्या सल्ल्याने मी सिंगापुरहून एक उच्च प्रतीचा कॅमेरा खरेदी केला होता व त्यांच्याकडूनच मायक्रोफोटोग्राफीचे प्राथमिक धडे घेतले होते. त्यामुळे मी रोज डझनावरी FNAC चे मायक्रोफोटोग्राफ्स काढू लागलो.तुषारने मला "ओरेल" आणून दिला व आपण FNAC चे असे पुस्तक तयार करू असा उत्साह दिला.

कुणी FNAC मधे Sea Annemone प्रमाणे तोंडाची उघडझाप करणारा जिवंत Hydatid पाहिला आहे का ? मी व तुषारने पाहिला आहे.Stronyloides larva च्या नृत्याला संगीत दिले आहे का ? आम्ही दिले आहे.आठवते ना रे तुषार ?

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page