थॅलेसेमिया निवारण
- dileepbw
- Nov 8, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाज मंडळ,कल्याण" या सांस्कृतिक संघटनेतर्फे आचार्य अत्रे नाट्यगृह,कल्याण येथे रविवार दि.२३ आॅक्टोबर,२०१६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या "गुणवंत विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरीक गौरव सोहळा" या कार्यक्रमात लाड सका(शाखीय) वाणी समाजातील गुणवंत महिला सौ.रेखा मालपुरे, कल्याण यांचे "थॅलेसेमिया निवारण व प्रतिबंध" या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान झाले.
सुमारे ५०० लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव व डोंबिवलीच्या भा.ज.प.च्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महिला नगरसेविका मा.सौ.अर्चना कोठावदे तसेच लाड सका(शाखीय) वाणी समाज मंडळ,नाशिक" चे अध्यक्ष मा.श्री.सचिनजी बागड,भिवंडीचे खासदार श्री.कपील पाटील यांना देखील या प्रबोधनाचा लाभ झाला.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात "थॅलेसेमिया" या विषयावर प्रबोधन झाल्यास समाजातील सामाजिक, राजकिय, आर्थिक व वैज्ञानिक शक्ती एकवटल्यास हा समाज नजिकच्या भविष्यकाळात "थॅलेसेमिया मुक्त" होण्यास विलंब लागणार नाही.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७००२)
Comentarios