देवांचे देव
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan)
भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती (उदा. सूर्य, चंद्र, तारे, अग्नी, वायू, वर्षा, वृक्ष-वल्लरी, प्राणीमात्र इ.) दर्शवितात तर काही "देव" उत्तम प्रवृत्तीचे (दया, क्षमा, शांती, त्याग, मानवता, सुबत्ता, उत्पादकता इ.) निर्देशक आहेत.
"ऋग्वेदा" मध्ये वारंवार ज्या "देवां" चा उल्लेख आढळतो त्यामध्ये इंद्र (२८९ वेळा), अग्नी (२१८ वेळा) व सोम म्हणजे चंद्र (१२३ वेळा) अशी क्रमवारी लागते.
"ऋग्वेदा" मध्ये उल्लेख झालेल्या अन्य "देवां" ची उल्लेखानुसार क्रमवारी सर्वांच्या माहितीसाठी कंसामध्ये देत आहे: -
विश्वदेव(७०), अश्विन(५६), वरुण (४६), मरुत(३८), मित्र(२८), उषा(२१), वायू(१२), सावित्र(११), रिभू (११), पूषण(१०), अप्रिस(९), बृहस्पती(८), सूर्य(८), दौस-नभ-स्वर्ग(६), पृथ्वी(६), आपस-जल-पाणी(६), आदित्य(६), विष्णू(६), ब्राह्मण पती(६), रुद्र(५), दधिक्रस(४), सरस्वती नदी(३), यम(३), पर्जन्य(३), वक-वाचा (३), वस्तोपती(२), विश्वकर्मा(२) व मन्यू(२).
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments