"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३३"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३३"
"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने आज "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.सांगतो त्याबद्दल आज !
आधी माझा "मोरपीसवाला" हा लेख वाचा.मग बरोबर संदर्भ लागेल.
प्रधानसरांचा नातेवाईक व गोखलेसरांचा माॅडर्न हायस्कूलमेट ENT Surgeon अविनाश माधव वाचासुंदर हा माझा लंगोटीयार ! खरे तर खाकी अर्धी चड्डीतला यार ! त्याला हस्तसामुद्रिकाचे वेड ! त्याच्या संग्रही "चिरो" या जगप्रसिध्द हस्तसामुद्रिकाचे ग्रंथ ! त्यामुळे मी पण त्याच्या "भजनी" लागलो."मोरपीसवाला" हा माझ्यासाठी "चिकाटी" व आपल्या विद्येवर अतूट "श्रध्दा" याचे प्रतीक ! म्हणून मी "हस्तसामुद्रिकाचा छंद" जोपासायला सुरूवात केली.
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा.श्री.देवदत्त दाभोलकर यांचे चिरंजीव व मनोविकाराचे रेसिडेंट प्रसन्न हा माझा वर्गमित्र ! तो अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्य करीत असे.त्याची नजर चुकवून मी माझा "हस्तसामुद्रिकाचा छंद" अघोर मांत्रिका प्रमाणे स्मशानात म्हणजे पर्याय म्हणून आपल्या "डेड हाऊस" मधे जोपासायला सुरूवात केली.
"मोरपीसवाला" मला "ठसे विज्ञान" शिकवून गेलेला असल्याने मी "अकाली मृत्यू" झालेल्या MLC चे हातांचे ठसे घ्यायला सुरूवात केली.त्यातली "Life Life(आयुष्य रेषा)" हा माझा "संशोधनाचा विषय" निश्चित केला.जवळ जवळ शंभर केसेसचा अभ्यास केला.माझे डिझर्टेशन "बर्न" या विषयावर असल्याने मला FMD कडून चांगले सहकार्य मिळत गेले.त्यांना "हस्तसामुद्रिक" हा माझ्या डिझर्टेशनचाच भाग वाटू लागला होता.इतका मी माझ्या "छंदाशी समरस" झालो होतो.
Comments