top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३८"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३८"


"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने आज "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.सांगतो त्याबद्दल आज ! माझ्या इंग्रजी कादंबर्‍या वाचण्याच्या "छंदा" तील हॅराॅल्ड राॅबिन्स यांची "Betsy" ही कादंबरी कोणीकोणी वाचलेली आहे ? त्यातली काही पाने पुन्हा पुन्हा वाचावीसी वाटायची व मन:चक्षुंसमोर ती दृश्ये पुन्हा पुन्हा साकार व्हायची.

या पुस्तकाची माझी एक आठवण सांगण्यासारखी आहे. तुम्हाला मला ज्येष्ठ असलेल्या RP in FM डाॅ.एलिझाबेथ ओमेन यांचा आगरवालसरांबरोबर झालेला वाद सांगीतल्याचे आठवते ना ? डिझर्टेशनमधे त्यांनी Series या शब्दाचे स्पेलिंग बदलायला लावले होते.त्यामुळे डाॅ.एलिझाबेथ या धाय मोकलून रडू लागल्या होत्या.मग मी त्यांना सरळ घरी पाठवून दिले होते व जाताना करमणुकीसाठी मी वाचत असलेली "Betsy" ही कादंबरी हातात ठेवली होती.

दुसर्‍या दिवशी भलतेच झाले.माझ्यावर खुश होण्याऐवजी त्यांनी धुसफुसतच माझ्या अंगावर "Betsy" ही कादंबरी फेकली व बरसल्या "I am a Syrian Christian ! Do not ever give me such filthy novels to read !

मला काहीच कळेना.जसजशी ही कादंबरी मी पुढे वाचत गेलो तस तसा सर्व खुलासा होत गेला व मीच ओशाळलो.या अनुभवातून एक गोष्ट शिकलो.कुठलीही कादंबरी संपूर्ण वाचून झाल्याशिवाय कुणालाही पुरस्कृत करायची नाही. महिलांना तर नाहीच नाही.

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page