top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४२"

  • dileepbw
  • Sep 2, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४२"

© दिलीप वाणी,पुणे

रक्तदात्यांच्या HIV Screening साठी वापरली जाणारी "Whole Viral Lysate - Generation I ELISA" ही एक मोठीच "डोकेदुखी" होती.तिला सुमारे २२% Cross reactivity असल्यामुळे HIV infection नसतानाच बर्‍याचदा टेस्ट "रिॲक्टिव्ह" येत असे.रक्तपेढीमधे त्याचे कन्फर्मेशन देखील करता येत नसे.त्यामुळे देशाने रक्तपेढीमधले HIV Screening बाबत "Anonymus Unlinked" अशी धर्मराजासारखी "नरो वा कुंजरोवा" भूमिका घेतली.याचा अर्थ असा की रक्तपेढीमधले HIV Screening हे फक्त Blood Unit साठी असून त्याचा रक्तदात्याशी काहीही संबध नाही.या धोरणामुळे रक्तपेढीमधले HIV Screening हे हीरो होंडा मोटार सायकलच्या जाहिरातीप्रमाणे(Fill it,Shut it,Forget it) तपासा,(रिॲक्टिव्ह आल्यास)फेका व विसरून जा" असे झाले.

या धोरणातला अडचणीचा भाग असा होता की रक्तदाता आपल्या Reactive HIV Status बाबत "अनभिज्ञ" रहात असे.त्याच्या स्वत:च्या"आरोग्याची हानी" तर चालूच राही,पण तो इतरांनाही HIV चा प्रसाद देत नाही.तसेच तो या अनभिज्ञतेमुळे पुन्हा पुन्हा रक्तदानाला येतच राही.

याला उपाय म्हणजे "समुपदेशन केंद्र" व अधिक चांगल्या तपासण्यांची(Genetion II-Recombinant based Antigen; Genetion III-Synthetic Peptide based Antigen) सोय निर्माण करणे आवश्यक होते.ती सोय सर्व प्रथम जनकल्याण रक्तपेढीने केली व नंतर तिचे अनुकरण देशभर सुरू झाले.या "समुपदेशन केंद्र" मधे पुढे "विनामूल्य आयुर्वेदिक उपचाराची सोय" का,कशी व कोणी सुरू केली ते पुढच्या लेखात अवश्य वाचा.

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page