"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४६"
- dileepbw
- Sep 3, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४६"
© दिलीप वाणी,पुणे
पॅथॉलॉजीस्टने रूग्णांना उपचार द्यावेत का ? हा नेहेमीच भांडणाचा विषय राहिलेला आहे.याला अपवाद ठरली ती रक्त घटक उपचार पध्दत(Blood Component Therapy) ! आज देखील अनेक तज्ञ रूग्णाला कोणता रक्त घटक द्यावा याबाबत सल्ला मसलत करतात तेव्हा मनाला बरे वाटते.
Rh System च्या Complexity(विशेषत: Du Antigen) बाबत जसे पुणेकर सज्ञान झाले तसे ते Rh immunisation बद्दल देखील सल्ला मागू लागले.आता Monoclonal Antibodies च्या जमान्यात कर्करोगग्रस्तांसाठी रुग्णसापेक्ष(Customized) उपचार देणे सुरू झालेले आहेत.त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करणे आवश्यक झालेले आहे.
HIV साठी उपचार उपलब्ध नसताना मला पॅथॉलॉजीस्ट असून देखील अनेक रुग्णांवर उपचार करावे लागले होते. Hepatitis B च्या सुरूवातीच्या काळात देखील Interferon Therapy उपलब्ध नसताना Hepatitis B च्या शेकडो Carriers वर उपचार करावे लागले होते. त्यासाठी बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे डाॅ.मित्रासर, औषधशास्त्र विभागातील माझे वर्गमित्र सुरेश डांगे,पत्की व बाळासाहेब घोंगाणे,NIV चे संचालक डाॅ.बॅनर्जी व संशोधिका डाॅ.विद्या अरणकल्ले,चढ्ढा व राॅड्रिक्स मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.कसे केले हे उपचार ?
आपण "काविळ" या विकारासाठी तसे पाहिले तर काहीच उपचार करीत नसतो.म्हणून अन्य शास्त्रांचा विचार केला. जनकल्याण रक्तपेढीचे अध्वर्यू वैद्य प.य.वैद्य खडीवाले यांनी "आरोग्यवर्धिनी" हे आयुर्वेदिक औषध सुचविले.त्याच्यावर आधुनिक पध्दतीने संशोधन सुरू केले.
उंदरांवर प्रयोग करून "आरोग्यवर्धिनी" मुळे "Chloroform induced Hepatotoxicity" ला प्रतिबंध करता येतो हे आधी सिध्द केले.या संशोधनात बापटसरांची खूपच मदत झाली.मग काविळीसाठी आयुर्वेद वाॅर्डात प्रवेशित असलेल्या रुग्णांना "आरोग्यवर्धिनी" चे उपचार करून त्यांचे "Sequential Biochemical Parameters" तपासून त्याची उपयुक्तता सिध्द केली.ही दोन्ही संशोधने "Indian Journal of Pharmacology" मधे प्रसिध्द झाली. त्यामुळे उत्साह बळावला व शेकडो HBsAg(Australia Antigen) Reactive रक्तदात्यांना "आरोग्यवर्धिनी" चे उपचार सुरु केले.या उपक्रमाचे "आंतरराष्ट्रीय परिणाम" पुढील लेखात सांगेन.
Comments