top of page

वाणी लोकांची सामाजिक विभक्तता

  • dileepbw
  • Nov 8, 2022
  • 1 min read

"सका/शक/Scythian" वंशाच्या वाणी समाजाची "सामाजिक विभक्तता"

"सका/शक/Scythian" वंशाचा वाणी समाज आपल्या व्यवसायाच्या समानतेमुळे काही प्रमाणात "एकात्म" दिसत असला तरी "रोटी-बेटी" सारख्या सामाजिक व्यवहारासाठी मात्र अजूनही "विभक्त" आहे. अखिल भारतीय वाणी समाजाची "सामाजिक विभक्तता" कशी दिसून येते ते खालील वर्गीकरण अभ्यासल्यास त्वरित लक्षात येईल.

"सका/शक/Scythian" वंशाचा अखिल भारतीय वाणी समाज वास्तव्याच्या "भौगोलिक" स्थानानुसार "तीन" प्रकारात विभागला गेला आहे. "गुजरात" मध्ये स्थायिक झालेले वाणी(गुजराती), "मारवाड" मध्ये स्थायिक झालेले वाणी(मारवाडी) तर "महाराष्ट्रा" त स्थायिक झालेले वाणी(मराठी) !

भारतातील एकूण वाणी लोकांपैकी फक्त ३.५७ % वाणी लोक "महाराष्ट्रा" त स्थायिक झालेले आहेत व ते सुद्धा खालील प्रकारे अनेक पद्धतीने, अनेक "उपगटा" त विभागले गेले आहेत.

१. महाराष्ट्रातील वाणी :- वाणी,भाटीया,तांबोळी,गांधी,लवण,हलवाई,भडभुंजे,कलाल

२. महाराष्ट्रातील वाणी मंडळींचे चार मुख्य प्रकार :- खानदेशी,गुजराती,मारवाडी,लिंगायत

३. महाराष्ट्रातील खानदेशी वाणी मंडळींचे सहा मुख्य प्रकार :- लाडसक्का,हुंबड,नेवे,काथर,वाळूंज,कुणकरी,चितोडे

४. महाराष्ट्रातील गुजराती वाणी मंडळींचे नऊ मुख्य प्रकार :- पोरवाड,मोढ,लाड,देसवाल,झरोल,वायदास,नागर,खाडायत,श्रीमाली

५. महाराष्ट्रातील मारवाडी वाणी मंडळींचे पाच मुख्य प्रकार :- अगरवाल,ओसवाल,मेश्री,ठाकूर,खंडेलवाल

६. महाराष्ट्रातील लिंगायत वाणी मंडळींचे चार मुख्य प्रकार :- पंचम,दीक्षावंत,चिलवंत,मेळवंत

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page