"शर्मिला-धर्मेंद्र वाढदिवस"
- dileepbw
- Dec 11, 2022
- 4 min read
"शर्मिला-धर्मेंद्र वाढदिवस"
दि.८ डिसेंबर,२०२२ हा शर्मिलाचा ७८ वा व धर्मेंद्रचा ८९ वा वाढदिवस ! त्या निमित्ताने आरतीने
शर्मिलाचा "खळीदार" फोटो पाठवला आहे.तर मी धर्मेंद्रचा "पीळदार" फोटो व त्याच्या काही "दमदार" आठवणी पाठवतो.माझी व शर्मिलाची पडद्या व्यतिरिक्त बाहेर कुठेही भेट झालेली नाही. त्याबाबतीत आरती लकी आहे."शर्मिला व धर्मेंद्र दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
धर्मेंद्रची व माझी पहिली भेट मी अकरावीत असताना माझ्या पनवेलमधील घराशेजारच्या गल्लीत झाली.सकाळी उठलो तर घराभोवती ही गर्दी ! "लोफर" सिनेमाचे शूटिंग चालू होते.एक ७-८ वर्षांचा मुलगा माझ्या घराशेजारच्या गल्लीत धावतो आहे असा शाॅट होता.तो होता मास्टर "सत्यजीत" ! याला काय पहायचे ? म्हणून घरात शिरणार एवढ्यात मोठा गलका झाला.धरम,धरम, धरम ! पाय आपोआपच मागे वळाले.मास्टर सत्यजीतची जागा आता धर्मेंद्रने घेतली होती. विशेष काही न घडता चित्रीकरण आटोपले व मी पण घरात परतलो.
धर्मेंद्रची व माझी दुसरी भेट मात्र चांगलीच प्रदीर्घ होती.जवळपास महिनाभर चालली.निमित्त होते "शोले" या सिनेमाचे चित्रीकरण ! या सिनेमातील रेल्वे ट्रॅकवरील हाणामारीचा "पहिला प्रसंग" ते या
सिनेमातील धरम-हेमा यांचा "शेवटचा प्रेमप्रसंग" याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळालेले आहे.या प्रेमप्रसंगाचे काहीच दिवसात प्रत्यक्ष विवाहात रूपांतर झाल्याचे आपण सर्वांनीच पाहिलेले आहे.खरे तर माझा लाडका हिरो "जितेंद्र" याने "हेमा" ला मागणी घातली होती.त्यांचे "वारिस" या सिनेमातील "कभी कभी ऐसा थी तो होता हैं" हे द्वंद्वगीत ऐकतानाच मी मनोमन त्यांची जोडी निश्चित केली होती. पण नियतीच्या मनात तसे घडायचे नव्हते.संजीवकुमार देखील हेमाच्या घरी पोहोचला होता तर ! असो.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची "लव्ह स्टोरी" कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही.त्यावेळी "ड्रीम गर्ल" वर अनेक अभिनेते फिदा होते.तिच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक होते.एक वेळ अशी होती की हेमा मालिनी अभिनेता जितेंद्र यांच्याशी लग्न करणार होत्या. पण त्याच वेळी धर्मेंद्र यांच्या एका फोन कॉलनं असं काही केलं की हेमा-जितेंद्र कायमचेच वेगळे झाले.१९७४ चा तो काळ जेव्हा एक नाही तर तीन-तीन मोठे स्टार हेमा यांच्याशी लग्न करायला तयार होते. संजीव कुमार, जितेंद्र आणि धर्मेंद्र या तिघांनाही हेमा आवडत होत्या. संजीव कुमार यांनी तर आपल्या आई-वडीलांना हेमा यांच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी पाठवलं होतं मात्र यावेळी हेमा यांच्या आईनं तिचं वय लग्नासाठी कमी असल्याचं सांगत हा प्रस्ताव नाकारला. यानंतर धर्मेंद्र हेमा यांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी हेमा यांच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली सुद्धा देऊन टाकली.जितेंद्र सिंगल होते. त्यामुळे त्यांनी दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारणं हेमा यांच्यासाठी खूपच कठिण झालं होतं. जितेंद्र त्यांच्या आई-वडीलांना घेऊन हेमा यांच्या घरी गेले. दोघांचे पालक एकमेकांशी बोलत असतानाच हेमा यांना धर्मेंद्रचा फोन आला. त्यांनी रागातच हा निर्णय घेण्याआधी एकदा मला भेट असं सांगितलं. त्या फोननंतर हेमा फारच बेचैन झाल्या.काय निर्णय घ्यावा हे त्यांना ठरवता येईना. त्यांची ही अवस्था पाहिल्यावर जितेंद्र यांना वाटलं की हेमा यांनी जर आपला निर्णय बदलला तर त्यामुळे त्यांनी तिरुपती मंदिरात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.हेमा याबद्दल विचार करतच होत्या इतक्यात पुन्हा एकदा फोन वाजला. पण यावेळी तो फोन जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा यांचा होता. शोभा यांनी जितेंद्र यांना प्रेमाची शपथ देत या लग्नाचा निर्णय घेण्याआधी विचार करण्याचा सल्ला दिला. हेमा यांच्या घरी सतत एकदा धर्मेंद्र तर एकदा शोभा यांचा फोन येत राहिला. असंही म्हटलं जातं की, धर्मेंद्र लगेचच फ्लाइटनं चेन्नईला हेमा यांच्या घरी जाऊन पोहोचले होते. त्यामुळे हेमा यांच्याशी लग्न करण्याचं स्वप्न शेवटी अपुरंच राहिलं. त्यानंतर १९७६ मध्ये जितेंद्र यांनी त्यांची गर्लफ्रेंड शोभाशी लग्न केलं आणि त्यानंतर धर्मेंद्र आणि हेमा यांनीही लग्न केलं.
धर्मेंद्र अत्यंत जिद्दी व्यक्तिमत्व ! मुंबईत काम न मिळाल्याने घराकडे परतणार होते.पण त्या कठीण काळात त्यांना "मनोजकुमार" या अभिनेत्याने साथ दिली.त्याच्या आयुष्यात एक दिवस असा आला होता की या मायानगरीत त्याला उपाशी-तहानलेले दिवस काढावे लागले होते.पण त्यावर मात करून धर्मेंद्र कसे "सुपरस्टार" झाले ते जाणून घ्यायलाच हवे.
चित्रपटसृष्टीत खूप कमी लोक आहेत ज्यांना संघर्ष करावा लागला नाही. मुंबईत पाय ठेवण्यासाठी लोकांना किती कष्ट करावे लागतात हे सर्वांनाच माहीत आहे. संघर्ष कधी कधी इतका लांबतो की ते परिस्थितीशी तडजोड करून घरी परतण्याचा बेत आखतात. धर्मेंद्रही असेच काहीतरी करणार होते, पण एका महान कलाकाराने त्यांना अडवलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा धर्मेंद्र पंजाबमधून आल्यानंतर मुंबईत नशीब आजमावत होते, तेव्हा त्यांची भेट "मनोज कुमार" यांच्याशी झाली. दोघेही एकाच मार्गावर होते त्यामुळे मैत्री पक्की झाली.
मनोज कुमार तेव्हा लेखक म्हणून काम करून आपला खर्च सांभाळत असे.पण धर्मेंद्र यांच्याकडे तसे काही नव्हते. ज्या चित्रपटामुळे ते पंजाबहून मुंबईत आले, तो चित्रपट कधीच बनला नव्हता.
कठीण काळात असताना बराच वेळ गेला आणि त्यांना काहीच काम मिळाले नाही. अगदी जेवणाची समस्या निर्माण व्हायला लागली तेव्हा त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.असं म्हटलं जातं की,एक दिवस निराश होऊन धर्मेंद्र स्टेशनवर पोहोचला आणि ट्रेनमध्ये बसला, तेव्हाच मनोज कुमारला याची माहिती मिळाली आणि त्यांनी लगेच स्टेशन गाठलं आणि धर्मेंद्रला ट्रेनमधून उतरवलं.खूप समजावून सांगितले आणि धीर धरा, तुम्हाला लवकरच काम मिळेल.अखेर मनोजच्या समजुतीने मदत झाली आणि तो परतला.१९६० मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.यानंतर मागे वळून पाहिले नाही.
स्वबळावर एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी धर्मेंद्र यांची मुलंही चित्रपटसृष्टीचा एक भाग बनली.
अभिनयाव्यतिरिक्त, धर्मेंद्र यांनी चित्रपट देखील केले आणि आजही सक्रिय आहेत आणि अनेकदा रिॲलिटी शोमध्ये दिसतात.एकेकाळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणार्या हा अभिनेत्याने आज ८९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.त्याचे मन:पूर्वक अभिनंदन !
शर्मिलाची व माझी कधीही भेट झालेली नसली तरी ज्याच्याशी अनेकदा भेट झाली त्या धर्मेंद्र बरोबरची त्यांची काही गाणी मात्र आठवतात.सांगतो.
यकीन,देवर,अनुपमा,सत्यकाम,मेरे हमदम मेरे दोस्त,एक महल हो सपनोंका व चुपके चुपके हे
शर्मिला-धर्मेंद्र या जोडीचे चित्रपट ! मला सर्वात आवडलेला "चुपके चुपके" हा विनोदी चित्रपट व त्यातील "बागोंमें कैसे ये फुल" हे गाणे !ानेहेमी "कुत्ते,कमीने,मैं तेरा खून पी जाऊंगा" अशा आरोळ्या ठोकणार्या धर्मेंद्रला दाग्दर्शक ह्रषिकेश मुकर्जी यांनी अतिशय संवेदनशीलपणे सादर केले.
धर्मेंद्रचा हाच संवेदनशील अवतार अशोक या लेखकाच्या भूमिकेत "ये फुल चमनमें कैसा खिला" या गाण्यात पहायला मिळतो.केसांचा "ट्रेडमार्क खोपा" केलेली शर्मिला व धर्मेंद्र यांचे काश्मिरच्या बागेत बागडताना म्हटलेले "मेरे हमदम मेरे दोस्त" मधील प्रेमगीतपण असेच अप्रतिम ! यकीनमधला
धर्मेंद्रचा "डबलरोल" व शर्मिला बरोबरचे "गर तुम भुला न दोगे" हे गाणे पण असेच अप्रतिम ! शर्मिलाच्या अन्य अभिनेत्यांबरोबरच्या गीतांवर लिहायला गेलो तर शब्द अपुरे पडतील.
コメント