top of page

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

  • dileepbw
  • Sep 5, 2023
  • 2 min read

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

©दिलीप वाणी,पुणे

आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा व विनम्र अभिवादन !

आयुष्यात प्रत्येकाला कोणी ना कोणी "गुरु" असतोच.पण माणुस हा आयुष्यभर विद्यार्थी आसतो ही माझी धारणा ! म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिकडून मग तो लहान असो की मोठा,मी काही तरी चांगले घेण्याचा,शिकण्याचा प्रयत्न करीत आसतो.मनातल्या मनात त्यांना "गुरु" मानतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,टप्यावर क्षणाक्षणाला भेटलेल्या त्या माझ्या असंख्य गुरूंना वंदन ! तुम्हाला माहित असलेल्या अशा काही गुरूंची आज आठवण करून देतो.

Patho OPD मधला "पीटर" हा मला "Painless finger prick master" बनवणारा पहिला गुरू ! तर "जे खळांची व्यंकटी सांडो" असे म्हणत म्हणत कणभर देखील युरिन खाली न सांडता "डिपाॅझिट" भरायचे तंत्र मला "आल्हाट" ने शिकविले.तर स्टूल व सिमेन ही सुगंधी द्रव्ये निर्विकार मनाने व अस्पर्श हाताने कशा पध्दतीने तपासायची हे "जमदाडे" ने शिकवले.त्यामुळे मी बर्‍यापैकी "स्थितप्रज्ञ" बनलो.CCL मधले "पुरंदरे" हे तर माझे महागुरू ! हलक्या हाताने ESR लावणे व फ्लास्कमधे ग्लास बीड्स टाकून रक्ताचा "फालुदा" म्हणजे Defibrination करणे हे त्यांच्या कडूनच शिकावे.

हिस्टोमधे "मेणाची बर्फी" बनवायला मला "खान" व "चिवटे" बाईंनी शिकवले.तर त्या बर्फीवरचे रफ कटिंग व फाईन कटिंग हे नक्षीकाम "एडवर्ड भिंगारे" यांच्याकडून मी आत्मसात केले.कसाई कामातले कसब मला "धनराज, शिवराज व विजू" यांनी शिकवले तर मुडदेघरात स्थितप्रज्ञासारखे वागायला मी "घोडेकर" कडून शिकलो.

दाभणछाप सुईने ३५० सी.सी. रक्त शोषायची किमया मी रक्तपेढीच्या "वांछू" कडून हस्तगत केली.तर "राठोड,पवार, नाईक,मोती,देवेंद्र" यांच्याकडून न डगमगता व एकाग्रता न भंगू देता कामाचे डोंगर उपसायची सहनशीलता शिकलो.

न कंटाळता पुन्हा पुन्हा तेच तेच काम करण्यात स्वत:चा जीव कसा रमवायचा ते क्लर्क "किरवे" ने शिकवले तर "एचकर" ने मला गोड बोलून कामांना कसे स्क्वेअरकट करायचे ते शिकवले.पडेल त्या कामात कसे निष्णात व्हायचे ते मी "पुष्पा चव्हाण" कडून शिकलो.तर "राखावी अंतरे बहुतांची" ही विद्या मी "नंदे" बाईंकडून शिकलो.

असे किती" गुरू" तुम्हाला आठवतात ?

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page