top of page

"सका/शक/Scythian" पूर्वजांचा इतिहास

  • dileepbw
  • Feb 23, 2021
  • 2 min read

Updated: Sep 5, 2022

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा इतिहास संकलन करण्याच्या माझ्या संशोधन कार्यास लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री.विजय शंकरराव विखरणकर, कल्याण या नाणेसंग्रहक इतिहास अभ्यासकाचे मोलाचे सहकार्य लाभते.त्या बद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद.

आपल्या "सका/शक/Scythian" पूर्वजांनी सुमारे ३०० वर्ष वायव्य व पश्चिम भारतावर राज्य केलेले आहे.हा सर्व इतिहास मी फेसबुकवर गेली सुमारे दहा वर्षे प्रसृत करीत आहे.भारतातील पहिला "सका/शक/Scythian" राजा "माओस" व शेवटचा "सका/शक/Scythian" राजा "तिसरा रूद्रदमन(? रुद्रसिंम्ह)" यांच्या नाण्यांच्या संग्रह श्री.विजयरावांनी जतन केला आहे.हे विशेष ! आज त्यांच्या संग्रहात महाभारतातील दुर्योधनाची आई "गांधारी" हिच्या "गांधार" या देशातील एक अतिशय प्राचीन असे नाणे जमा झालेले आहे.त्याचा फोटो सर्वांच्या माहितीसाठी सोबत जोडत आहे. या नाण्याचा इतिहास श्री.अक्षय चव्हाण यांनी दि.१५ एप्रिल,२०२० रोजी प्रसृत केलेल्या "History of India" या लेखात वाचायला मिळतो. तो खालील प्रमाणे :-

बोलन खिंडीतून भारतात आलेल्या "सका/शक/Scythian" लोकांनी सिंध,गुजरात व माळवा या प्रांतांवर उज्यैन येथून "पश्चिम सत्राप" म्हणून राज्य केले व या "सका/शक/Scythian" लोकांचे साम्राज्य इ.स.४१५ साली दुसरा चंद्रगुप्त याने लयाला नेले अशी माहिती या लेखात "The Domino Effect" या सदराखाली त्यांनी दिली आहे. इ.स.पू.तिसर्‍या शतकात मंगोलियातील Xiongnu टोळ्यांनी Lao Shang राजाच्या नेतृत्वाखाली चीनच्या Tarim Basin (Xingjian) प्रांतातील Yeuzhi लोकांवर हल्ला चढविला.त्यामुळे त्यांनी पश्चिमेकडे पलायन केले.तेथे त्यांनी Lake Issykkul (Kazakhstan) येथे इ.स.पू.१५० साली Wu-Sun टोळ्यांचा पराभव केला.त्यामुळे Wu-Sun लोकांना भारताकडे स्थलांतरीत व्हावे लागले व तेथे ते "शक" म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतरचा "सका/शक/Scythian" लोकांचा इतिहास श्री.अक्षय चव्हाण यांनी श्री खालील प्रमाणे दिला आहे :-

"सका/शक/Scythian" राजा माओस याने इ.स.पू.६० साली भारतातील ग्रीक राजा Apollodotus II याचा पराभव केला व त्याची तक्षशिला येथील राजधानी बेचिराख केली. त्यानंतर हे "सका/शक/Scythian" लोक गांधार,पाकिस्तानमार्गे भारतात शिरले. याचे असंख्य पुरावे पाकिस्तानी इतिहासकर श्री.अहमद हसन वाणी यांनी चिला,हुंझा,शाहदौर येथे झालेल्या उत्खननात शोधून काढले आहेत. सका लोकांचा राजा Maues याने Hazara(in Khyber Pakhtunkhwa region of Pakistan) येथे इ.स.पू.९० साली "दंडीन" नावाच्या प्रांतपालाची नियुक्ती केली व पुढे मथुरेकडे कूच केले. Cambridge History of Iran मधे मात्र सका राजा Maues हा ग्रीकांचाच मांडलिक राजा होता व त्याने ग्रीकांविरूध्द बंड केले होते असा उल्लेख आढळतो. Maues नंतरचा सका राजा Azes I याने इ.स.पू.५८ साली भारतातील ग्रीक राजा Hippostratos याचा पराभव करून राज्यारोहण केले. भारतीय संशोधक श्री.भगवानलाल इंद्रजी यांनी मथुरेचा सका राजा Muki (Maues) याचे थडगे उत्खननात शोधून काढले आहे.हे विशेष ! चीनी व ग्रीक इतिहासकारांनी लिहिलेल्या या इतिहासाशी सुसंगत असा इतिहास महाभारतात देखील वाचायला मिळतो.कुरू राजा जनमेजय याचा "सर्पयज्ञ" म्हणजे तक्षशिलेचा नागपूजक ग्रीक राजा "तक्षक" याच्याशी झालेले युध्द असा अन्वयार्थ लावावा लागतो. यावेळी "आस्तिक" नावाच्या ग्रीक आई असलेल्या भारतीय राजाने ग्रीकांना सहाय्य केल्याचा उल्लेख आढळतो. रामायणात देखील भरताने स्थापन केलेल्या गांधार देशातील पुष्कलावती,तक्षशिला व पुरूषपुर(Peshawar) या शहरांचा उल्लेख आढळतो. श्री.विजय शंकरराव विखरणकर,कल्याण यांच्या संग्रही आज दाखल झालेले हे नाणे त्यावरील बौध्द चिन्हांमुळे कुशाण राजा "कनिष्क" याच्या काळातील किंवा त्याही आधीच्या काळातील असावे असे मला वाटते.



Recent Posts

See All
कुलग्रामे व कुलनामे

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page